सुपरवॉरियर हा भारतीय जनता पार्टीला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश मिळवून देणारा सुपरहिरो आहे - ॲड अनिल काळे
धाराशिव: भारतीय जनता पार्टी कार्यालय तुळजापूर येथे येथे आज सुपर वॉरियर या प्रमुख विषयाने बैठक झाली या बैठकीमध्ये महावीजय 2024 सुपरवारीयार मराठवाडा विभागीय सहसमनव्यक पदी निवड झाली म्हणून तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य adv अनिल काळे यांनी बोलताना सांगितले कि विधानसभा मतदार संघातील 100 सुपरवारीयर हे पुढील 15 वर्षाचे नेतृत्व असणार आहे त्यामुळे चांगले काम केल्यास याच सुपरवारीयर मधून जी प सदस्य प स सदस्य नगरसेवक आमदार खासदार होणार आहेत सुपर वॉरियर यांनी गावात जाऊन बुथवर 100 ते 150 कार्यकर्त्याची बैठक घ्यावी व त्या बूथ प्रमुखाला मान सन्मान देऊन त्याचा जाहीर सत्कार करावा त्याचा बॅनरवर फोटो टाकावा व सक्षम असा बूथ प्रमुख करावा जेणे करून त्या बूथ मध्ये 51 टक्के मतदान भाजप उमेदवाराला झाले पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून मा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावयाचे आहे व मा ना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे व आ राणा दादा यांना 50000 हजार मताधिक्याने निवडून आणायचे आहे या साठी आपण सर्वजण मिळून बूथ सक्षम करूयात यावेळी नेताजी पाटील साहेबराव घुगे दीपक आलुरे राजसिंह राजेनिंबाळकर आनंद कंदले यांचेही मार्गर्शन झाले यावेळी आ राणा दादा यांनीही ऑनलाईन सवांद साधला यावेळी विक्रम मालक देशमुख राजकुमार पाटील प्रभाकर मुळे विजय शिंगाडे शांताराम पेंदे सर्व वॉरियर उपस्थित होते शेवटी तालुका अद्यक्ष संतोष दादा बोबडे यांनी आभार मानले.
0 Comments