शिराढोण क्रांती नगर पारधी पिढी येथे श्रमिक मानवाधिकार संघ,पोलीस व तहसील यंत्रणेच्या वतीने बैठक संपन्न
कळंब/ भिकाजी जाधव दि.१२: कळंब तालुक्यातील मौजे शिराढोण येथील क्रांती नगर पारधी पेढी गायराण जमीनी मध्ये दि.१२जानेवारी २०२४रोजी विविध विषयांवर बैठक घेण्यात आली. या बैठकिमध्ये श्रमिक मानवाधिकार संघ, पोलीस,व तहसिल यंत्रणा यांची उपस्थिती होती, या वेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,कळंब तालुक्याचे तहसीलदार प्रिया वंदा म्हडकदकर, शहाजी पाटील, श्रमिक मानवाधिकार संघाचे भाई बजरंग भाऊ ताटे यांनी मार्गदर्शन केले.
तर या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, दैनिक आरंभ मराठीचे पत्रकार अमरसिंह चंदेल, किरण पाटील, शिराढोण ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी करपे या वेळी उपस्थित होते.या वेळी महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, वृद्ध शेतमजूर, पेन्शन योजना इत्यादी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व सदर ठिकाणी पारधी आदिवासी चे १६ प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये ० ते६ वयोगटातील लहान बालकांची आधार कार्डही काढण्यात आली.
या कार्यक्रमात निवासी अतिक्रमण व शेती प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नावे करा हे प्रश्न समोर आले. या वर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी सर्व यंत्रणेच्या अधिकारी यांनी आदिवासी पारधी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.या बैठकिसाठी मोठ्या संख्येने पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments