Hot Posts

6/recent/ticker-posts

जि. प . प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस(malshiras) येथे मुख्यमंत्री संदेश (message)पत्राचे वाचन व वाटप.

जि. प . प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे मुख्यमंत्री संदेश पत्राचे वाचन व वाटप.

अकलूज,दि १३.(प्रतिनिधी): जि.प.प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे,आज नगरसेवक श्री. टेळे,सदर आदर्श कन्या शाळेचे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष-

श्री.सुनील संभाजी ओवाळ, माळशिरस, यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री संदेश पत्राचे वाचन करून  वाटप करण्यात आले.आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती आहे आणि त्याची तयारी विद्यार्थ्यांना वर्तमानातच करावी लागणार आहे. शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा. असा संदेश असणारे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ संभाजी शिंदे यांचे संदेश पत्र सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यत्वे 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानामध्ये सर्व शाळांनी सर्व पालकांनी सहभागी होऊन शाळेचा विकास करावा व शाळा सुंदर बनवाव्यात हा संदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी 'महावाचन महोत्सव' विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी म्हणून 'माझी शाळा माझी परसबाग' हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. 

राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजना राबवली आहे. गणवेशासोबत सर्व मुला मुलींना बूट आणि पायमोज्यांची जोडीही देण्यात येत आहे. शासन समाज हे जसे तुमच्या उज्वल भविष्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करत आहेत तसाच विचार तुम्ही अगदी छोट्या गोष्टींपासून करू शकता तुमचे घर ,परिसर ,गाव स्वच्छ रहावे हे जसे तुम्हाला वाटते ,तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या. त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल. तुम्हीच हा बदल घडू शकता. हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो ,या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल असा महत्वपूर्ण संदेश या संदेश पत्रात दिलेला आहे. 

सदर संदेश पत्र पाहून सर्व  उपस्थितांनी शाळेसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय देशमुख केंद्रप्रमुख सौ .उज्वला  नकाते  यांच्या मार्गदर्शनाखाली या संदेश पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी माळशिरस मधील जि .प. शाळातील शिक्षक वृंद श्री .चांद नदाफ , श्री.पांडुरंग माने , श्रीम .सोनी कानडे श्रीम. राणी झुंजरुक ,श्रीम .पुष्पांजली शिखरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments