Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीच्या वादाच्या कारणावरून तिघास बेदम मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शेतीच्या वादाच्या कारणावरून तिघास बेदम मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल


धाराशिव :तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील तिघांना शेतीच्या वादातून बेदम मारहाण झाल्याची घटना दिनांक 17 रोजी चिवरी शिवारात घडली आहे, या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांना सविस्तर माहिती अशी की  1)लक्ष्मण निलाप्पा घोडके, 2) शिवाजी लक्ष्मण घोडके, 3) निलकंठ लक्ष्मण घोडके, 4) रेखा लक्ष्मण घोडके, 5) लक्ष्मी निळकंठ घोडके, 6) सत्यभामा शिवाजी घोडके, सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी यांनी दि. 17.01.2024 रोजी 16.00 वा. सु. चिवरी शिवारातील शेतात फिर्यादी नामे-प्रविण प्रकाश घोडके, वय 35 वर्षे रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळई, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी जखमी केले. तसेच फिर्यादीचे भाउ सतिश घोडके व भरत घोडके यांनाही नमुद आरोपींने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळई, काठीने मारहण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण घोडके यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 325, 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments