Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग शहरामध्ये शिंदे गटाचा जल्लोष

नळदुर्ग शहरामध्ये शिंदे गटाचा जल्लोष

तुळजापुर : शिवसेना अपात्र निकाल प्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काय निकाल देतात याकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले होते. नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंचीच निकाल दिला आणि सर्वत्र शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरू केला.राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कार्यकर्ते एकत्र जमल्याचे चित्र आहे. फटाके फोडत, पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना शिंदे गट दिसत आहे,तर ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग  शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना शहरप्रमुख दीपक घोडके युवा सेना शहरप्रमुख अफझल कुरेशी विधानसभा शहर संघटक दीपक घोडके ज्येष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा बंडू कशेकर बाबू गायकवाड सचिन शिंदे विलास मोरे गजानन हळदे नितीन सुरवसे श्रीकांत जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कोणाची या निकालामध्ये वाचन करून खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच खरी शिवसेना आहे अशा निकाल दिल्यानंतर नळदृग शहरांमध्ये जल्लोष करण्यात आला यामध्ये गुलालाची उधळण करून फटाकाची आतिषबाजी करून सर्व गावकऱ्यांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम खंडोबा जय मल्हार नगर येथे फटाक्याच्या आदेश बाजी करून बाळासाहेब ठाकरे चौक येथे आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले त्यानंतर,,,, संविधान चौक मध्ये आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथेही,,, फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून पेढे वाटण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 यानंतर गावातील चावडी चौक येथील सर्व गावातील जेष्ठ व सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी मिळून चावडी चौक येथे फटाक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून जयघोष करण्यात आल्या व सर्व आनंदाने पेढे वाटून एकमेकाला पेढे भरण्यात आले यामध्ये आनंदोत्सव साजरा करून जयघोष करण्यात आला.

Post a Comment

0 Comments