Hot Posts

6/recent/ticker-posts

वृद्धाला दहा वर्ष सक्तमजुरी, या कलमाखाली ठोठावली शिक्षा|Ten years of hard labor for an old man, the sentence imposed under this section

वृद्धाला दहा वर्ष सक्तमजुरी, या कलमाखाली ठोठावली शिक्षा

छत्रपती संभाजीनगर: अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली, या घटनेस कारणीभूत ठरलेल्या वृद्धाला दहा वर्षे सक्तमजुरी यांना विविध कलमाखाली 7000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के आर चौधरी यांनी ठोठावली. भागाजी गणपत काटकर वय 70 राहणार तालुका फुलंब्री असे आरोपीचे नाव आहे.

विशेष म्हणजे आरोपीने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला तेव्हा आरोपीने पीडीतेला मारहाण केली होती. तेव्हापासून पिडीता त्याला खूप घाबरत होती या घटनेनंतर आरोपी हा वयस्कर असून लोक माझ्याबद्दल काय विचार करतील या भीतीपोटी तीने आरोपीचे नाव न घेता त्यांच्या मुलानेच आपल्यावर अत्याचार केल्याची सांगितले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आणि डीएनए चाचणीनंतर गुन्ह्याचा उलगडा झाला होता. या प्रकरणात 14 वर्षीय पीडीतेच्या आईने फिर्यादी होती. त्यानुसार पीडीताही मावशीकडे शिक्षणासाठी होती. १० ऑक्टोंबर 2021 रोजी पिढीतेचे आई-वडील पिढीतील भेटण्यासाठी गेले असता ही गर्भवती असल्याचा संशय आला. त्यांनी पिडीतेला रुग्णालयात नेली असता ती गर्भवती असल्याची समोर आले. बाल कल्याण समिती येथे पीडीतेचा जबाब घेतला असता प्रथम तिने आरोपी भागाजी याचा मुलगा साईनाथ यांनी 5 एप्रिल 2021 रोजी घरी कोणी नसताना अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानुसार वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीची डीएनए चाचणी केली मात्र ती चाचणी नकारात्मक आली त्यामुळे पोलिसांनी गावातील लोकांची चौकशी सुरू केली मात्र काहीच सुगावा लागला नाही. पोलिसांनी पिडीतेला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा पिडीतिने सांगितली की, 5 एप्रिल 2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पिडीता एकटी घरी होती. तेव्हा आरोपी भागाजी हा पिडीतेच्या घरी आला. त्यांनी घराची दार लावून घेत पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केला. पिडीतिने विरोध केला असता त्याने पिडीतेला मारहाण केली, त्यामुळे पिडीता त्याला खूप घाबरत होती, त्याच्या भीती पोटीच त्याच्या ऐवजी त्याच्या मुलानेच अत्याचार केल्याची पोलिसांना सांगितल्याचे जबाबात नमूद करण्यात आली आहे.

या प्रकरणात तपास अधिकारी तथा उप निरीक्षक ए.सी कुंभार यांनी दोषारोपपत्र  दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहाय्यक लोकाभियुक्त सुदेश शिरसाट यांनी 11 साक्षीदार तपासले सुनावणी अंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. या प्रकरणात उपनिरीक्षक एस बी वाघमारे आर एस दवंगे हवालदार शीला घुगे एडवोकेट शिरसाट यांनी सहकार्य केले.

या कलमाखाली ठोठावली शिक्षा

 भादवि कलम 376( 2) अन्वये दहा वर्षे सक्त मजुरी पाच हजार रुपयाचा दंड, कलम 452 अन्वे एक वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड, कलम 506 अन्वये सहा महिने शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Post a Comment

0 Comments