मुख्याध्यापिका एल.के.बिराजदार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी करबसप्पा बिराजदार यांना सन अँड ओशन समन्वय समिती पुणे यांच्यावतीने मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. भानुदासराव धुरगुडे यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने तुळजापुर येथे दि,१ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ८९ वे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थांतुन अभिनंदन होत आहे.
0 Comments