जरांगे पाटलांच्या उपोषणाला बारामतीतून दीड हजार चार चाकी वाहने जाणार
दि. १९, बारामती : बारामती तालुक्यातून जरांगे पाटलांच्या उपोषणाला एकूण एक ते दीड हजार चार चाकी वाहने व सामानाचे टेम्पो दि. २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. शिवाजी उद्यान, कसबा, बारामती येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगाव मध्ये मोरगावचे आजूबाजूच्या गावातील समाजबांधव सकाळी ०८.०० वा. एकत्र जमतील व त्यांचेसह संपूर्ण बारामती तालुक्यातील समाज बांधव पुण्याकडे कूच करत देहूरोड येथे पोहोचणार आहेत.
या आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासोबत आंदोलनासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य सोबत घेण्यात ये आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे. बारामती तालुक्यातील जे समाज बांधव आंदोलनासाठी येणार आहेत ते सर्वजण रांगे पाटलांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जो पर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments