Hot Posts

6/recent/ticker-posts

जि.प.प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे हळदीकुंकू कार्यक्रम व माता पालक सभा उत्साहात संपन्न

जि.प.प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे हळदीकुंकू कार्यक्रम व माता पालक सभा उत्साहात संपन्न

गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध..!!


माळशिरस : जि. प. प्राथमिक आदर्श कन्या शाळा माळशिरस येथे दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी हळदी कुंकू कार्यक्रम व माता पालक सभा किशोरवयीन मुलींचे समुपदेशन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व माता-पालकांना केंद्रप्रमुख सौ. उज्वला नकाते यांनी मार्गदर्शन केले.

किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावरील उपाय , माझी शाळा सुंदर शाळा अभियान याबाबत  माहिती दिली. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका श्रीम.सोनी कानडे यांनी शाळेतील विविध उपक्रमाविषयी व विद्यार्थी गुणवत्तेबाबत माता पालकांशी चर्चा केली.हळदी कुंकू कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांच्या मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या उखाणे स्पर्धा, संगित खुर्ची, लिंबू चमचा इत्यादी स्पर्धा मधून क्रमांक प्राप्त महिलांना बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सौ .उज्वला नकाते, केंद्रातील ज्येष्ठ शिक्षिका, वासंती देशपांडे, सौ . संगिता पोरे तसेच अंगणवाडी सेविका शिक्षण प्रेमी सुजाता गोखले, सौ.सूर्यवंशी, पत्रकार शोभा वाघमोडे व सर्व माता पालक उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  श्रीम.सोनी  कानडे, श्रीम. राणी झुंजरक, सौ.पुष्पांजली शिखरे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments