राष्ट्र घडणीसाठी युवकांच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वपूर्ण - राजेंद्र केसकर
बारामती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४ चा उद्घाटन समारंभ दि. १७ जानेवारी २०२४ रोजी म्हसोबावाडी येथे उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी राजेंद्र केसकर प्रादेशिक परिवहन अधिकारी, हर्षदा खारतोडे आणि ऋषिकेश हंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राजेंद्र राऊत सरपंच, म्हसोबावाडी,रमेश चांदगुड उपसरपंच, ऍडव्होकेट.तुषार झेंडे पाटील,पोलिस पाटील , महाविद्यालयाचे प्राध्यापक हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. मंगल गावडे- माळशिकारे, कार्यक्रम आधिकारी यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगून या विशेष श्रमसंस्कार शिबिरात होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावर्षी श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच यावर्षी शिबिरात ग्रामसफाई, ग्राम सौर सर्वेक्षण, जलसंवर्धन, मूल्यशिक्षण, पर्यावरण संवर्धन व जागृती, जैवतंत्रज्ञानाद्वारे जैव ग्राम शाश्वत विकास इ. अशा विविध उपक्रमांचा सहभाग करून घेतला आहे. या शिबिरादरम्यान पुणे विद्यापीठ आणि विविध शासकीय अधिकारी, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी इ. मान्यवर हे या शिबिरास सदिच्छा भेट देणार आहेत .या सर्वांबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाधिकारी प्रा. मंगल गावडे यांनी शिबिराची दिनचर्या ही मुलांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र केसकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांंबरोबरच शैक्षणिक जीवनात राष्ट्रीय सेवा योजना सारख्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले व्यक्तिमत्व तसेच शैक्षणिक घडामोडींचा विकास करावा याबद्दल विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताना त्याची सुरुवात आणि येणाऱ्या यश- अपयश यांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, अड. तुषार झेंडे पाटील, राज्य ग्राहक संरक्षण संघटनेचे सदस्य यांनीही आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना या शिबिराचे महत्त्व पटवून दिले आणि यातून मिळालेल्या अनुभवाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उदघाटन प्रसंगी उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगल गावडे, डॉ. मंगेश कोळपकर, प्रा. मेघना देशपांडे, प्रा. सविता साबळे, प्रा. गौतम कुदळे, प्रा गणेश वाळके, प्रा. कांचन खिरे, प्रा. सलमा शेख, प्रा. तृप्ती कदम उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिर उद्घाटन समारंभ यशस्वीपणे पार पडण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, ,डॉ. राहुल तोडमल, प्रा. नीता नांदगुडे, डॉ. अमर भोसले,प्रा. राजेंद्र बळवी, डॉ. राजेश शर्मा, प्रा. नीलिमादेवी,
प्रा. कुंडलिक गवारे , प्रा. दत्ता जगताप, , प्रा. भारतीय तावरे, प्रा. सोनाली काटकर, प्रा. विशाल शिंदे आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सलमा शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. कांचन खिरे तर आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती कदम यांनी केले.
0 Comments