श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालयात 'स्वीप' अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन
धाराशिव : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीसाठी जनजागृती व्हावी म्हणून 'SWEEP 2023' कार्यक्रमांतर्गत एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, उपमुख्याध्यापक श्री. एस. बी. कोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा विद्यालयातील शिक्षक श्री. डी. वाय. घोडके सर, श्री. बी. एस. नन्नवरे सर, श्री. एम. पी. काळे सर, श्री. एस. व्ही. पाटील सर, श्री. के. बी. मोहिते सर, श्री. ए. जे. खुने सर, श्री. शिंदे एल. एस. सर, श्री. आर. एस. भोसले सर, श्री. लोमटे ए. ए. सर, सौ. शेळके मॅडम आदींच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments