Hot Posts

6/recent/ticker-posts

२०२४ च्या निवडणुकीत परत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. -ओम राजेनिंबाळकर

२०२४ च्या निवडणुकीत परत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. -ओम राजेनिंबाळकर


धाराशिव : धाराशिव येथे समर्थ मंगल कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव तालुक्यातील पदाधिकाऱ्यासाठी संघटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वी मी जनतेला आपल्या घरातील व्यक्ती, भाऊ म्हणून मतदान मागीतले व याच जनतेच्या आर्शीवादाने या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असून अहोरात्र सर्वसामान्य शेतकरी, मतदार यांच्या लहानसहान अडी-अडचणी सोडवण्याचा प्रामणिकपणे प्रयत्न करत आहे. ज्यावेळी कोरोनाची साथ आली त्यावेळी मी व आमदार कैलास पाटील, नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी समजून प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान दिले. कोरोना काळात ज्या गावात रुग्ण आढळला. त्या प्रत्येक गावात मी पोहचलो व त्या गावात कोरोना काळात घ्यावयाची काळजी त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी उपस्थीतीत आहेत का याची खबरदारी व रोगप्रतीकारशक्ती वाढवण्याच्या गोळया वाटपाचे काम तसेच मोफत कोव्हीड सेंटर चालु करून अनेक रुग्णांना मोफत उपचार चालू केले  शिवसेनेच्या माध्यमातून केले.

ज्या माणसांना 40 वर्ष शरद पवार साहेबांनी आमदार, खासदार व मंत्री केले ती माणसे याउपकाराची कसलीही तमा न बाळगता ते क्षणात त्यांची पवार साहेबांची साथ सोडून केवळ मंत्रीपदाच्या आशेपोटी भाजपमध्ये गेली. मात्र मी व आमदार कैलास पाटील चालू खोका पेटीच्या जमान्यात कोठेही न डमगता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या विश्वासाल तडा न जाऊ देता खंबीरपणे आम्ही व सर्व शिवसेना पदाधिकारी साहेबांच्या पाठीशी आहोत. तसेच आम्हास केलेल्या मतदारांचा कसलाही अवमान होणार नाही व त्यांचा स्वभीमान कायम ठेवला आम्ही केला.

आज उध्दवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदावर असताना जिल्हयासाठी महत्वाचे पुर्ण शासकीय मेडीकल कॉलेज मंजुर केले. तसेच 7 TMC पाण्यासाठी देखील भरीव तरतुद केली. साहेबांनी कोरोना काळात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही व अशा मानसाला पक्षातीलच स्वार्थी मंडळींनी व राजकीय लालसेपोटी याप्रकारे पदावरुन घालवले, पक्ष व चिन्ह चोरले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत आपल्या पक्षाबद्दल प्रचंड सहानुभुती असून पक्षातील पदाधिकारी व शिवसैनीकांनी या लाटेचा वापर करुन निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, मतदान गोळा करुन घेण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे.  प्रत्येक बुथवर आपली बुथयंत्रना सक्षम करावी. तसेच लोकप्रतीनिधीच्या माध्यमातून तसेच आपले सरकार असताना झालेले कल्याणकारी निर्णय सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहचवावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.


मी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे खासदार झालो असे काही लोकाचे जरी म्हणणे असले तरी त्यांनी यापुर्वी सन 2004 साली कल्पनाताई नरहिरे व त्यांच्या पुर्वी शिवाजी बापु कांबळे हे हिंदुह्दयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक व मतदारामुळे

खासदार झाल्या होत्या त्यावेळी नरेंद्र मोदीची लाट होती का ?  याचा विचार या मंडळींनी करावा.धाराशिव लोकसभा मतदार संघ पुर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे.  मी आजपर्यंत सर्वसामान्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असून अडचणीला धावून जात आहे व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. मला या मेहनतीच्या जोरावर 2024 ला ही जनता मला 2019 पेक्षा आधिकचे मताधिक्य देईल याचा मला ठाम विश्वास आहे.

यावेळी आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर, राज्य विस्तारक अक्षय ढोबळे,तालुका प्रमुख सतीश सोमानी, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, महिला युवती सेनेच्या मनिषा वाघमारे, माजी पंचायत समीती उपसभापती शामभैय्या जाधव, शिवसेना जिल्हा अल्पंसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष  आमीरभाई शेख, माजी नगरसेवक गणेश खोचरे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, शिवसेना ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष मोईन पठाण, आफरोज फिरजादे, पंकज पाटील, अभिजीत देशमुख, उपतालुका प्रमुख सौदागर जगताप, विभाग प्रमुख मुकेश पाटील,  सुमीत बागल, वाघोली सरपंच संजय खडके,जुनोनी सरपंच आमोल मुळे, विभाग प्रमुख व्यंकट गुंड, उपतालुका प्रमुख आण्णा पवार, विभाग प्रमुख धनंजय इंगळे, विभाग प्रमुख संतोष कंदले, अजय नाईकवाडी, उपतालुका प्रमुख दादा कोळगे, वडगाव माजी सरपंच अंकुश मोरे, अविनाश इंगळे, साबीर सय्यद, मुजीफ काझी, गफुर शेख, साकेर शेख, कमील कुरेशी, छोटा साजीद, सुनिल जाधव, अर्जुन साळुंके शिवसैनिक पत्रकार व महिला आघाडी या पदाधिकारी उपस्थीत होत्या.

Post a Comment

0 Comments