बनावट मृत्युपत्र तयार करत जमीन लाटली, सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर : मयत इसमाच्या नावाने बनावट मृत्युपत्र तयार करत खोट्या मृत्युपत्राचे आधारे सातबारा व फेरफार नोंदीत बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात अगस्ती पुंडलिक बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप बाजीराव उदार, तुकाराम वामन ढगे, महेश जनार्दन ढगे, सर्व राहणार चाभुर्डी, गोरख पोपट भवाळ धालवडी तालुका कर्जत, संपत जगताप, राजू तुकाराम जगताप दोघे राहणार कोळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ विजय बोराडे हा मयत झाल्यानंतर फिर्यादीच्या भावाचा अंत्यविधी आरोपीने पोस्टमार्टम करून न देता अंत्यविधी करण्यास सांगत फिर्यादीच्या भावाच्या नावावरील जमिनीचे बनावट मृत्यू पत्र तयार केले. त्या मृत्युपत्रावर आरोपीने फिर्यादीच्या भावाची बोगस सही करत संगणमताने फिर्यादीच्या भावाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. अशा खोट्या मृत्युपत्राच्या आधारे सातबारा व फेरफार यांच्यावर नोंदी करून जमिनीची नोंद आरोपी गोरख पोपट भवाळ धालवडी तालुका कर्जत यांच्या नावे करत फिर्यादीची ठकबाजी करून फसवणूक केली तसेच आरोपी प्रदीप उदार यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत गावात राहण्यास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.
0 Comments