Hot Posts

6/recent/ticker-posts

त्नी व मुलाला विषारी औषध पाजून तरुणाची आत्महत्या, ९ वर्षाची चैत्राली सुदैवाने बचावली|Young man commits suicide by ingesting poison to his wife and child, 9-year-old Chaitrali luckily survives

पत्नी व मुलाला विषारी औषध पाजून तरुणाची आत्महत्या, ९ वर्षाची चैत्राली सुदैवाने बचावली


अहमदनगर : पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून तरुणांनी पत्नी व पोटच्या सहा वर्षे मुलाला विषारी औषध पाजत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडी जवळ घडली. या घटनेत गजानन भाऊ रोकडे वय 35 ,पौर्णिमा गजानन रोकडे वय 34, दुर्वेश गजानन रोकडे वय सहा सर्व राहणार  उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 9 वर्षाची चैत्राली गजानन रोकडे ही सुदैवाने बचावली असून तिच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजानन भगवान रोकडे व त्याची पत्नी पौर्णिमा असे दोघे रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथे राहत होते. रांजणगाव गणपती येथील पतसंस्थेत दोघेही नोकरीला होते. दिनांक 5 जानेवारी रोजी गजानन भगवान रोकडे हे पत्नी पौर्णिमा मुलगी चैत्राली व मुलगा दुर्वेश यांना उदापूर येथून श्रीरामपूर कडे जाण्यासाठी मोटरसायकल वरून निघाले असता, रस्त्यातच पती-पत्नीचे भांडण झाले त्यामुळे गजानन यांनी त्यांची पत्नी पौर्णिमा मुलगा दुर्वेश व मुलगी चैत्राली यांना त्यांच्याकडील ड्रम मधील विषारी औषध बळजबरीने पाडले, त्यानंतर मुलगा दुर्वेश याला पाण्याच्या ड्रममध्ये फेकून दिली तर पत्नी पौर्णिमा हीला साडीने गळफास देऊन ठार मारली व स्वतः देखील साडी ने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक संदीप गायकवाड करत आहेत.

Post a Comment

0 Comments