धाराशिव : व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी गोविंद खुरुद यांची निवड|
धाराशिव: पत्रकार क्षेत्रातील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी येथील जेष्ठ पत्रकार गोविंद खुरूद यांची निवड करण्यात आली आहे . त्यांना या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी पत्रकारदिनी दिले आहे.गोविंद खुरुद गेली तेवीस वर्षे पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारितेतील मास्टर ऑफ जर्नालिझम ही पदवी देखील प्राप्त केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातून त्यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळीजिल्हा कार्याध्यक्षपदी निवडीचे गोविंद खुरूद यांना पत्र देताना जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यावेळी उपस्थित डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव पारवे पत्रकार आदित्य खुरूद अदी उपस्थित होते.
0 Comments