Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलची बाजी|Farmer Development Panel's battle against various development executive societies at Chivari in Tuljapur taluka

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास(अपक्ष) पॅनलची बाजी




  तुळजापुर : तालुक्यातील चिवरी   येथील विविध विकास कार्यकारी  सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत  शेतकरी विकास (अपक्ष)पॅनलने दणदणीत विजय मिळविला. या पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर विरोधी महालक्ष्मी ग्राम विकास पॅनलचा  पराभव झाला, महालक्ष्मी ग्रामविकास पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.  चिवरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक दि, २८  रोजी पार पडली. त्यानंतर ताबडतोब मतमोजणी करण्यात आली.यामध्ये शेतकरी विकास (अपक्ष)पॅनलमधील  विजय उमेदवार आरगे शांताबाई राम, इंगळे शाहूराज सोपान, जाधव सुभाष विश्वनाथ, मुळे ज्ञानदेव लक्ष्मण, पाटील दत्तात्रय भगवान, शिंदे बालाजी मोतीराम, शिंदे नागनाथ सुब्राव, येवते शिवाजी लक्ष्मण,  शिंदे वनिता रावसाहेब, झांबरे कुसुमबाई आण्णासाहेब, कोरे गोरोबा सोपान, परीट विष्णू सोपान, चिमणे मोतीराम सिद्राम यांनी विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आताषबाजी करून गुलालाची उधळण करीत आनंदोउत्सव साजरा केला.बालाजी शिंदे व बालाजी पाटील मित्र परिवाराचे कायम वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे.




Post a Comment

0 Comments