तुळजापुर येथे श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन|Idol installation ceremony organized in Sriram temple at Tuljapur

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन|Idol installation ceremony organized in Sriram temple at Tuljapur

तुळजापुर येथे श्रीराम  मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन,राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त  (दि१६, १७,१८ १९.२० ,२१,२२) जानेवारी २०२४ तुळजापूर शहरात सहा दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन, 

पंधरा हजार पेक्षा अधिक श्रीराम भक्त राहणार उपस्थित. 


तुळजापुर (प्रतिनिधी) : अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा ( दि. २२) जानेवारी२०२४   सोमवार रोजी संपन्न होत असून लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून तुळजापूर शहरातील आर्य चौक येथील श्रीराम मंदिरात श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त (दि.१६ जानेवारी२०२४,) (दि. १७)जानेवारी,(दि.१८)जानेवारी आणि( दि. २० जानेवारी२०२४  शनिवार , (दि.२१) जानेवारी२०२४  रविवार व (दि.२२) जानेवारी२०२४  सोमवार रोजी या दिवशीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पंधरा हजार पेक्षा अधिक श्रीराम भक्त उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. 

(दि१६) जानेवारी२०२४ रोजी आर्या चौक येथील श्री राम मंदिरात दुपारी ४ ते रात्री १०वाजेपर्यंत महिलांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, (दि.१७) जानेवारी रोजी मोटर सायकल रॅली, (दि.१८) जानेवारी रोजी रिक्षा रॅलीचे आयोजन केले आहे तर 

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना ( दि. २०) जानेवारी 2024 शनिवार रोजी पहाटे ५:३०   वा.  श्रीराम फेरीस सुरुवात, व सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन, शोभायात्रेचा मार्ग  मंदिर दीपक चौक तुळजाभवानी मंदिर पावणारा गणपती मंदिर साळुंखे गल्ली आर्य चौक डुल्या मारुती चौक श्रीराम मंदिर असा शोभायात्रेचे मार्ग असून सकाळी  दहा  वाजता होमकुंडाची स्थापना सायंकाळी चार ते सहा श्रीराम कथा कथाकार प्रजापती विष्णुदास प्रसाद लोखंडे पी.एस.आय. धाराशिव यांचा कार्यक्रम सायंकाळी सायंकाळी सहा वाजता श्रीराम रक्षा पठण स्थानिक भजनी मंडळासह पाच हजार पाच हजार  भक्तांचा हरिपाठ व  रात्री८.वा. ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील आळंदी यांचे किर्तन .

(दि.२१ जानेवारी२०२४  रविवार रोजी सकाळी नऊ वाजता वाजेपासून होम हवन विधी सायंकाळी चार ते सहा श्रीराम कथा व सायंकाळी सहा वाजता श्रीराम रक्षा पठण स्थानिक भजनी मंडळासह पाच हजार भक्तांचा हरिपाठ रात्री आठ वाजता ह भ प लक्ष्मण महाराज पाटील आळंदी यांचे कीर्तन

( दि. २२) जानेवारी २०२४ सोमवार रोजी दुपारी १२ वा. होमाची पूर्णाहुती दुपारी १२:२२ वा. श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना यानंतर समस्त राम भक्त तुळजापूर शहरवासी यांच्या वतीने दुपारी १२:३०वा. भगवती विहीर ते आर्य चौक परिसरात महाप्रसाद महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या सोहळ्यासाठी गेली अनेक दिवसापासून तुळजापूर शहरातील मान्यवरांकडून श्रीराम भक्तांकडून जयत तयारी  करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments