Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर नगरपरिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. तुळजापूर या संस्थेची सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीकरिता संस्थेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पुर्ण होऊन एकुण 11 संचालकापैकी 10 संचालकाची बिनविरोध निवड

तुळजापुर नगरपरिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. तुळजापूर या संस्थेची सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीकरिता संस्थेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पुर्ण होऊन एकुण 11 संचालकापैकी 10 संचालकाची बिनविरोध निवड


तुळजापुर  : नगरपरिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. तुळजापूर या संस्थेची सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीकरिता संस्थेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पुर्ण होऊन एकुण 11 संचालकापैकी 10 संचालकाची बिनविरोध निवड झाली व 01 जागा आरक्षित (NT) चा उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त राहिली. तसेच या प्रक्रियेकरिता सहाय्यक निबंधक संस्था, तुळजापूर मा. श्री. डी. जी. मोरे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. ए. व्ही. जाधव मुख्य लिपीक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया दि. 01/02/2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत पार पडली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी श्रीमती प्रफुल्लता प्रदिप बरूरकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे


मा. निवडणूक अधिकारी यांनी घोषीत केले.

तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष पदासाठी श्री. नागनाथ श्रीराम काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या संस्थेच्या उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे मा. निवडणूक अधिकारी यांनी घोषीत केले.

तसेच नवनिर्वाचित विद्यमान संचालक 1) श्री. सज्जन शिवाजीराव गायकवाड 2) श्री. बापुसाहेब बब्रुवान रोचकरी 3) श्री. दत्ता मनोहर चोपदार 4) श्री. अमर अशोकराव ताकमोघे 5) श्री. राम सादु सिरसट 6) श्रीमती जयश्री गणेश कांबळे 7) श्री. प्रमोद ज्ञानोबा भोजने 8) श्री. अनिल भगवान पारधे

तसेच या प्रक्रियेकरिता तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय रामभाऊ साळुंके यांच्या सहकार्याने निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. याकरिता नगरपरिषद कर्मचारी कार्यालय अधिक्षक श्री. वैभव पाठक, तसेच श्री. रणजित कांबळे, श्री. अशोक सनगले व संस्थेचे माजी चेअरमन श्री. संजय झाडपिडे तसेच कार्यालयाचे आजी-माजी कर्मचारी व सर्व नगरपरिषद कर्मचारी वृंद उपस्थित होते.उपस्थितांचे आभार मानुन सभाअध्यक्ष यांच्या परवानगीने सचिव श्री. जयजयराम माने यांनी सर्वांचे आभार मानुन सभा संपल्याचे जाहिर केले.



Post a Comment

0 Comments