Hot Posts

6/recent/ticker-posts

सासरच्या जाचास कंटाळून तुळजापुर येथे विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सासुविरूध्द गुन्हा दाखल

सासरच्या जाचास कंटाळून तुळजापुर येथे विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सासुविरूध्द गुन्हा दाखल


तुळजापुर  : शहरातील हडको परिसरात एका नवविवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० शनिवार रोजी रात्री दहा वाजता उघडकीस आली असून या घटनेनंतर आरोपी पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवर्त केलेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की.  मयत नामे-गायत्री अतिश देवकर, वय 21 वर्षे, रा. हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.02.2024 रोजी 18.00 वा. पुर्वी राहते घरी हडको तुळजापूर येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- अतिश संजय देवकर, 2) स्वाती संजय देवकर, 3) संजय मोहन दरेकर सर्व रा. हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत गायत्री देवकर हीस तुझ्या आई वडीलांनी लग्पामध्ये काही एक करणीधरणी कली नाही. महेरहुन घरसंसार उपयोगी सामान, भांडी व एक लाख रुपये घेवून ये म्हणून सतत शिवीगाळ व माहराण करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून गायत्री देवकर यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवानंद विलास पाटील, वय 41 वर्षे, रा. चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 498(अ), 323, 504, 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments