Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजाभवानी मंदिर संस्थांचा संस्थांचा लेखाधिकारी सहा लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

तुळजाभवानी मंदिर संस्थांचा संस्थांचा  लेखाधिकारी सहा  लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात 


धाराशिव:  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चा वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यास सहा लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी दिनांक 7 रोजी धाराशिव एसीबी विभागाने रंगेहात पकडले आहे.   मंदिर संस्थान संचलित शाळेच्या नूतन इमारत बांधकामाचे  बिल काढण्यासाठी दहा लाखाची लाच मागून यातील सहा लाख रुपये रोख स्वीकारताना शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

 याबाबत  मिळालेली अधिक माहिती अशी की   यातील तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 03 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे. सदर बांधकामाचे आत्तापर्यंत 02 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579/-रु ही परत मिळवून देण्यासाठी आलोसे याने पंचासमक्ष  10,00,000/- ( दहा लाख रुपये) ची मागणी करुन तडजोडीअंती 6,00,000/-रु ( सहा लाख रुपये) स्विकारण्याचे मान्य करुन आज रोजी पंचासमक्ष 6,00,000/-रु लाच रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन तुळजापुर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. ही कारवाई सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,  मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, सापळा पथक - पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांनी केली.


लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा

कार्यालय 02472 222879

टोल फ्री क्रमांक.1064

Post a Comment

0 Comments