धाराशिव :श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव दि,१० : धाराशिव शहरांमधील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद होऊन समन्वय साधला जावा यासाठी विज्ञान शाखेतील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सह विचार सभेस विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य देशमुख एस.एस. होते. तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गाडे एफ.एल., माजी प्राचार्य पडवळ एस.एस., उपप्राचार्य घार्गे एस.के., जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पुजारी डी.व्ही., प्रा.सरडे आर.पी. गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशन बॅचचे प्रमुख प्रा.आंबेवाडीकर व्ही.जी. पालक प्रतिनिधी श्री. नेताजी धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासह विचारसभेच्या सुरुवातीला विद्यालयाचे उपप्राचार्य श्री घार्गे एस. के. यांनी प्रास्ताविकातून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यालयात होत असलेले उपक्रम तसेच विद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. जीवशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. पुजारी डी.व्ही. यांनी १२ वी बोर्ड परीक्षा, CET परीक्षा, NEET परीक्षा JEE परीक्षा अशा सर्व परीक्षांबाबत सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व पालकांना केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य देशमुख एस.एस.यांनी या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, पालकांनी विद्यार्थ्यांबाबत कसे जागृत असावे, विद्यार्थ्यांप्रती वागणूक कशी असावी आणि शिक्षक विद्यार्थी हे नाते कसे प्रेरणादायी बनावे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी केलेल्या सूचना, विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.
ही सहविचार सभा यशस्वी होण्यासाठी प्रा.कापसे एस.के, प्रा.पवार एल.व्ही, प्रा.माशाळकर पी.एस, प्रा.कापसे व्ही.एम, प्रा.स्वामी व्ही.बी, प्रा.शेटे एस.पी, प्रा.कुलकर्णी एस.एस, प्रा.श्रीमती देशमुख एम.एम, प्रा.सौ.देशमुख एस.एस, प्रा.दहिफळे जी.व्ही, श्री घोडके ए.व्ही, श्री.तांबोळी बी.ए, श्री डावकरे एल.एल. आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डोलारे एम.बी तर आभार प्रा.सौ.भोसले एल.टी.यांनी मानले.
या विद्यार्थी-पालक-शिक्षक सहविचार सभेस पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील व प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments