शेतीच्या वादातून सख्या भावानेच केला भावाचा खून उमरगा तालुक्यातील घटना
धाराशिव : शेताच्या वादातून सख्ख्या भावालाच काठीने बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी एका विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास व उमरगा तालुक्यातील समुद्राळ शिवारात घडले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील मूळ रहिवाशी अंकुश बब्रुवान अंबुरे व मयत संतोष भगवान अंबुरे हे सध्या उमरगा येथील जकापूर कॉलनीत वास्तव्यास आहे यांची समुद्राळ येथे गट नंबर 53/2 मध्ये शेतजमीन आहे. याच शेतजमिनीच्या कारणावरून या दोघा भावंडांमध्ये वाद सुरू होता या वादाचे पर्यावसण दिनांक 11 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हाणामारी मध्ये झाले. यावेळी अंकुश अंबुरे यांनी भाऊ संतोष याला काठीने मारहाण करून जखमी केले, यामध्ये गंभीर जखमी संतोष याचा मृत्यू झाला याप्रकरणी संतोष यांच्या आई शालुबाई बब्रुवान अंबुरे राहणार समुद्राळ तालुका उमरगा यांच्या फिर्यादीवरून दुसरा मुलगा अंकुश अंबुरे यांच्या विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात कलम 302 भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बालाघाट न्युज टाइम्स लोहारा धाराशिव
0 Comments