उस्मानाबाद लोकसभा निवडणूक रणसंग्राम : 35 उमेदवारांचे अर्ज वैध तर एक बाद
निवडणूक लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार
धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची शनिवारी दिनांक 20 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी 36 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध,तर एका उमेदवाराची अर्ज अवैध ठरल्याची माहित निवडणूक अधिकाऱ्याने दिले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दिनांक 22 अंतिम मुदत आहे त्यामुळे त्या दिवशी कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेणार व निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार ? हे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे आगामी काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी दिनांक 19 रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 36 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले होते. या अर्जाची शनिवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत छाननी करण्यात आली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री यादव सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थिती होती या छाननीत 36 पैकी 35 उमेदवाराचे अर्ज वैध ठरले तर अपक्ष उमेदवार वर्षा कांबळे यांचा अर्ज बाद झाला.
यावेळी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर बहुजन पार्टीचे संजय वाघमारे ,राष्ट्रीय समाज दलाचे आर्यनराजे शिंदे, वंचित आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर , देश जनहित पार्टीचे नेताजी गोरे , विश्व शक्ती पार्टीचे नवनाथ दुधाळ, हिंदुराष्ट्र संघाचे नितेश पवार ,टिपू सुलतान पार्टीचे रहिमुद्दीन काजी, आदर्श संग्राम पाटीलचे एडवोकेट विश्वजीत शिंदे, समनक जनता पार्टीचे शामराव पवार ,स्वराज्य जनशक्ती सेनेचे नौशाद शेख, ऑल इंडिया मजलीस् ए इतेहादुल मुस्लिमीनचे सिद्दिक बौडीवाले, समता पार्टीचे ज्ञानेश्वर कोळी ,अपक्ष अर्जुन सलगर, अरुण जाधवर ,उमाजी गायकवाड, काका कांबळे ,काका खोत, आमदार विक्रम काळे ,गोवर्धन निंबाळकर, नवनाथ उपळेकर, नितीन गायकवाड, बाळकृष्ण शिंदे, एडवोकेट भाऊसाहेब बेलुरे, मनोहर पाटील ,योगीराज तांबे ,राजकुमार पाटील, राम शेंडगे ,विलास घाडगे, शायनी जाधव ,समीरसिंह साळवी ,सोमनाथ कांबळे ,हनुमंत बोंदर, यांचे वैध ठरले अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दिनांक 22 रोजी अंतिम मुदत आहे त्यामुळे त्या दिवशी कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेणार व निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणर हे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे आगामी काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे नागरिकाची लक्षवेधी आहे
0 Comments