Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदयदायक घटना : चाकूर तालुक्यामध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू

हृदयदायक घटना : चाकूर तालुक्यामध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू


लातूर : ऊन पावसाचे खेळानंतर शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती जिल्ह्यात चाकूर निलंगा आवसा रेनापुर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली रब्बी हंगामातील पिकाची काढणी झाल्याने धोका टळला असला तरी आंबा फळ पिकास भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे ठीक ठिकाणी वीज कोसळून 13 जनावर दगावली आहेत, तसेच चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने सार्थक संतोष ढोले वय 21 या युवक जखमी झाला होता उपचारासाठी त्याला लातूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले सार्थक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यांच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर रविवारी दि, 21 रोजी यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.

तर दुसरी घटना तालुक्यातील अंजनसोंडा खुर्द येथे घडली आहे शेतातील घराच्या पाठीमागे थांबले असलेल्या मंगलाताई अशोकराव पाटील वय 65 यांच्या अंगावर वीज कोसळली यामध्ये त्यांचा जागेत मृत्यू झाला त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments