Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात विविध सत्कार संपन्न

धाराशिव:  श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात विविध सत्कार संपन्न


धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान विभागाच्या एकत्रित मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे औचित्य साधून श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले व पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री. के. वाय. गायकवाड यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच २००९ - १० या शैक्षणिक वर्षात कला शाखेतून उत्तीर्ण झालेले माझी विद्यार्थी श्री. अमोल जाधव यांची रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य व उपप्राचार्य यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. प्राचार्य श्री. देशमुख सर यांनी इयत्ता अकरावीचे प्रवेश, उपक्रम व गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपप्राचार्य श्री. घारगे सर यांनी शिक्षकांची उपस्थिती, बायोमेट्रिक, फोटॉन व फिनॉमिनल बॅचचे कामकाज याविषयी माहिती दिली. तसेच प्राध्यापक डी. व्ही. जाधव सर यांनी मौजे गौडगाव तालुका बार्शी येथे कार्यरत असलेल्या सौ. प्रेमाताई पाटील वरीष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशाची, सोयी - सुविधांची व कामकाजाची माहिती दिली. 

या कार्यक्रमासाठी कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख श्री. एन. आर. नन्नवरे सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री. एम. व्ही. शिंदे सर, गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशनचे प्रमुख श्री. व्ही. जी. आंबेवाडीकर सर आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर व प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य भैया पाटील सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments