विज थकबाकीची उत्कृष्ट वसूल केल्याबद्दल महावितरण अभियंत्याचा सत्कार
दसुर प्रतिनिधी / संजय निंबाळकर : मा. कार्यकारी अभियंता श्री काळे साहेब व मा. उपकार्यकारी अभियंता श्री बोधे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीपूर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री. सूळ साहेब, वेळापूर शाखा कार्यालयाचे सहाय्य्क अभियंता श्री. डोळे साहेब, पिलीव शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्री. थोरात साहेब, बोडले शाखा कार्यालयचे कनिष्ठ अभियंता श्री. भोई साहेब, वेळापूर शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री. कदम साहेब यांच्या नेतृत्वात वेळापूर उपविभागातील जनमित्रांनी उत्कृष्ठ थकबाकी वसुली केल्याबद्दल सर्व जन्मीत्राचा भव्य सत्कार करण्यात आला.
यामध्ये ज्या जनमित्रांनी आपल्या भागातील विज बिल थकबाकी शून्य केली आहे अश्या जनमित्रांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच बाकी सर्वांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.
वेळापूर उपविभागातील सर्व शाखा अभियंता व सर्व जनमित्रांच्या वतीने मा. उपकार्यकारी अभियंता श्री बोधे साहेब यांचा उत्तम प्रकारे टीम नेतृत्व केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
0 Comments