तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात, जमिनीची फेरफार ला नोंद घेण्यासाठी मागितली होती लाच
धाराशिव : फिर्यादीच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी 4000 रुपयाची लाच मागून तडजोडीअंती 3000 रुपयाची मागणी करणाऱ्या आंदोरा सज्जाच्या तलाठ्याला एसीबी पथकाने ताब्यात घेतली आहे. ही कारवाई रविवारी दिनांक 19 मे रोजी करण्यात आली असून या प्रकरण लाचखोर तलाठी विरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत एसीबी कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार तक्रारदार पंचवीस वर्षे तरुणाच्या भावाच्या नावाने शेतजमिनी खरेदी करण्यात आली होती या जमिनीची फेरफारला नोंद घेण्यासाठी तक्रारदाराच्या वतीने कळम तालुक्यातील आंदोरा सज्ज्याचे तलाठी कल्याण शामराव राठोड ईटकुर सज्जा अतिरिक्त पदभार यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु तलाठी कल्याण राठोड वय 43 राहणार ज्ञानेश्वर नगर राजीव गांधी चौक बीड यांनी तक्रारदारास या कामात नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी 4000 रुपयांची लाचेची मागणी केली यावेळी तडजोडी अंतिम तलाठी राठोड यांनी या शासकीय कामासाठी 3000 रुपयाची रक्कम घेण्याचे मान्य केले.
परंतु तक्रारदार तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने दिनांक 14 रोजी या तक्रारीबाबत पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी कल्याण राठोड यांनी पंच व पथका समक्ष फिर्यादीकडे तीन हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली. यावेळी तलाठी राठोड यांनी सदरील नोंद घेण्यासाठी स्वतःसह साहेबांना ही पैसे द्यावे लागतात असे सांगून सदरील रकमेची मागणी केली त्यानुसार लाचीची रक्कम मागणी करून स्वीकारण्याची तयारी दाखवल्याप्रकरण तलाठी कल्याण राठोड यांना रविवारी एसीबी पथकाने ताब्यात घेऊन याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .यावेळी सापळा अधिकारी म्हणून एसीबीची पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले हा सापळा यशस्वी करण्यासाठी एसीबी चे छत्रपती संभाजी नगर विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्री मेहेत्रे साहेब फौजदार शेख दिनकर उगलमुगले विष्णू बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर आदींनी यशस्वी केली.
लाचखोराबाबत तक्रार असल्यास संपर्क साधावा
कोणतीही शासकीय अथवा निम शासकीय काम करत असताना लोकसेवक अथवा खाजगी व्यक्ती कायदेशीर कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आली आहे यासाठी नागरिकांनी एसीबीच्या कार्यालयात 02472 222879 या क्रमांकावर अथवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आव्हान एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हैञे यांनी केले आहे.
0 Comments