महाराष्ट्र :निराधारांचे अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना : बँकांची खेटे होणार बंद
शासनाकडून निराधार यांना विविध योजनांच्या माध्यमातून महिना काठी दीड हजार रुपये मानधन दिले जाते ते लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यासाठी यापूर्वी तहसील कडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता.
तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेमध्ये खेटे मारावी लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारंची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे.
ही द्यावी लागणार कागदपत्रे
निराधारांना विविध योजनांच्या माध्यमातून महिना काठी दीड हजार रुपये मानधन दिले जाते ती आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड, बँकेची पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत पैसे देणार आहेत.
0 Comments