Hot Posts

6/recent/ticker-posts

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर विलंबाने उपचार घेणे बेतले जीवावर,शेतकऱ्यांचा मृत्यू

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर विलंबाने उपचार घेणे बेतले जीवावर,शेतकऱ्यांचा मृत्यू 


नांदेड : कुत्रे व त्यातल्या त्यात पिसाळलेले चावल्यानंतर उपचार न करता लग्नकार्यात व्यस्त राहणे जीवावरच बेतले असून धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील शेतकरी गंगाधर पाटील नरवाडे वय 45 यांचे कुत्रा चावल्यावर रेबीज या आजाराने रविवारी दिनांक 19 रोजी निधन झाले आहे 

कुत्रे व त्यातल्या त्यात पिसाळलेले चावल्यावर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेणे व त्याची तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. चोंडी येथील गंगाधर पाटील नरवाडे यांना तीन महिन्यापूर्वी गावात पिसाळलेले कुत्रे चावली होते पण लगीन घाई व इतर कार्यक्रमात ते एवढे व्यस्त होते की उपचार करायला त्यांना वेळ लागला दरम्यानच्या काळात आभाळ मेगर्जना व पावसामुळे तर त्यांचा प्रतिकूल परिणाम कुत्रा चावलेला रुग्णावर होत असतो त्याला रेबीज म्हणतात. तसाच परिणाम गंगाधर पाटील नरवाडे यांच्यावर झाला त्यांना वेदना असह्य झाल्यामुळे त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे दिनांक 19 मे रोजी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले.


कुत्रा चावल्यावर तात्काळ उपचार करा

कुत्रे चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस घेणे अतिशय गरजेची असते सदर लस घेतली नाही तर कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याच्या लाळेतून रेबीजचे अतिशय सूक्ष्म विषाणू माणसाच्या रक्तात मिसळतात व निसर्गाच्या पोषक वातावरणात ते माणसाच्या शरीरात उफाळतात तेव्हा कुत्रा चावलेला माणूस अगदी कुत्र्यासारख्याच हालचाली करत असतो त्यासाठी कुत्रा चावल्यानंतर तात्काळ रेबीज प्रतिबंधक लस घेऊन पुढील उपचार करणे गरजेचे असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments