अशील हा वकिलाचा ग्राहक नव्हे : हायकोर्ट
मागता येणार नाही ग्राहक मंचात दाद
नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण कायदा वकील व्यवसायाला लागू होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले त्यामुळे वकिलांनी केस नीट चालवली नाही असे तुम्हाला वाटली तरी तुम्ही त्याच्याविरुद्ध आता ग्राहक मंचात दाद मागू शकणार नाहीत.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या अंतर्गत सेवेतील त्रुटी किंवा कमतरतेसाठी वकिलांना जबाबदार धरता येणार नाही तसेच निकृष्ट सेवेबद्दल त्यांच्यावर ग्राहक मंचात खटलाही चालवता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले आहे वकिली अन्य व्यवसायाहून भिन्न असून या कामाचे विशिष्ट स्वरूप आहे त्यामुळे त्याची अन्य व्यवसायाशी तुलना होऊ शकत नाही असे न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी व न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने सांगितले.
या सेवेच्या करारात नियंत्रण पूर्णपणे वकिलाच्या ग्राहकाकडे असते त्यामुळे हा करार वैयक्तिक सेवेचा आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत सेवेच्या व्याख्या बाहेर असल्याचा आमच्या मताला बळकटी मिळते असे खंडपीठाने म्हटले. एनसीडीआरसीच्या 2007 च्या निर्णयात असे म्हटले होते की वकील आणि त्याच्या सेवा ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत येतात.
0 Comments