Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोग्यवृत्त : उन्हाळ्यात जपा मुलांची आरोग्य!|Health report: Protect children's health in summer

आरोग्यवृत्त : उन्हाळ्यात जपा मुलांची आरोग्य!|Health report: Protect children's health in summer


सध्या उन्हाळा सुरू असून तापमान ही रेकॉर्ड तोडत आहे अशा परिस्थितीत लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केली तर ते आजारी पडू शकतात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये ऊन सहन करण्याची शक्ती खूप कमी असते. थोड्या उन्हामुळेही ते लगेच आजारी पडू शकतात अशावेळी ऊन आणि उष्णतेपासून मुलांना वाचवणे फार गरजेचे आहे नाहीतर विनाकारण दवाखान्याचे तोंड पाहायची गरज पडते.

उन्हाळ्यात मुलांना सुट्टी असते अशातच त्यांच्यातील ऊर्जा त्यांना स्वस्त बसू देत नाही त्यामुळे ही मुलं उन्हातानाचा विचार न करता खेळायला जातात अशावेळी त्यांच्याकडे लक्ष देणे फार आवश्यक असते अनेकदा मुलं पाणी न पिताच घरातून बाहेर पडतात खेळताना मोठ्या प्रमाणावर घाम येतो परिणामी शरीरातील पाणी बाहेर पडतं परंतु मुलं बाहेर खेळायला गेलेली असल्यामुळे तहान लागली तरी ते पाणी पीत नाहीत परिणामी शरीरातील पाणी कमी पडून डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते कधी कधी उन्हात खेळल्यामुळे उष्माघातासारखा प्रकार होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

लहान मुले वेळच्या वेळी भरपूर पाणी पीतील याकडे घरातील मोठ्या व्यक्तीने लक्ष देणे गरजेचे आहे लहान मुलं पाणी पिण्यास नको म्हणतात परंतु लाडीगोडी लावून त्यांना जास्तीत जास्त पाणी पाजणे गरजेचे आहे शरीरात पाण्याची प्रमाण कायम राहावे यासाठी फळे सलाद फळांचा ज्यूस लिंबू पाणी असे घरगुती पदार्थ मुलांना खायला प्यायला द्यावेत. तसेच मुलांना उष्णतेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे मुले उन्हात खेळणार नाही याकडे लक्ष द्यावे उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे मुलांना घालावेत गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात तर पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे उष्णता रोधक म्हणून काम करतात त्यामुळे शरीर थंडगार ठेवण्यास मदत होते मुलांना उन्हाळ्यातील आजारापासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना दुपारी बाराती पाच वाजेपर्यंत बाहेर पाठवू नका उलट घरातच ठेवा त्या काळात त्यांना घरगुती खेळ खेळायला प्रवर्त करा वेळ आली तर मोठ्या माणसांनी त्यांच्याबरोबर खेळ खेळावेत बाहेरचे खेळ खेळण्यासाठी मुलांना सायंकाळी पाठवा उन्हाळ्याच्या काळात मुलांना तेलगट तुपकट जड अन्नापासून दूर ठेवा या जंक फूड मुळे शरीराची उष्णता वाढते अशा प्रकारचे अन्न पचवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते त्यामुळे शरीर डीहायड्रेट होऊ शकते या ऐवजी त्यांना टरबूज खरबूज द्राक्ष आंबे अशी फळे खाण्यासाठी द्यावी डोळे खोल जाणे थकवा जाणवणे जुलाब लागणे ताप येणे थंडी वाजणे अशी लक्षणे जाणवले असता ताबडतोब ताबडतोब मुलांना दवाखान्यात न्या.

Post a Comment

0 Comments