धाराशिव :खासदाराच्या शेतात चोरट्यांचा डल्ला विद्युत पंपाचे केबल लंपास
प्रतिकात्मक फोटो

धाराशिव : जिल्हाभरात शेती पंप तसेच केबल दुचाकी दाग दागिने घरफोड्या आदी चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाली आहे. यातील अनेक चोरांचा तपास लागत नसताना आता थेट चोरट्याने खासदाराच्या शेतात डल्ला मारत पोलिसांना आव्हान दिली आहे. चोरट्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील विद्युत पंपाचे बाराशे रुपयांची केबल चोरून नेले आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात दिनांक 20 ते 21 मे च्या रात्री घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाल्या सविस्तर माहिती अशी की अशोक बळीराम साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की चोरट्याने कोल्हे गाव शिवारातील ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील लाईटच्या बोर्ड पासून ते विहिरीवरील पाण्यापर्यंत विद्युत पंपाचे 25 ते 30 फूट वायर ज्याची किंमत बाराशे रुपये आहे असे चोरून नेले आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून चोरट्यांनी थेट खासदाराच्या शेतातच डल्ला मारल्याने याची चांगली चर्चा होत आहे.
0 Comments