तुळजापूर तालुक्यातील या गावातील ओढ्यात वाहू लागले निळसर पाणी, ग्रामस्थांची पाणी पाहण्यासाठी गर्दी
धाराशिव : राज्यात अनेक भागात मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस सुरू होत आहे .यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, शेती कामाला वेळ आला आहे यातच धाराशिव जिल्ह्यात विचित्र घटना घडली, तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील एका ओढ्या शेजारील जमिनीमध्ये वीज पडली आहे त्यामुळे तेथील भूगर्भातून येणारे पाणी निळसर येऊ लागली आहे. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे .त्याची व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर वायरल केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील मसला खुर्द गावातील काटी रस्त्यावरील परिसरातून वाहणाऱ्या एका ओढ्यातून रविवार दि,९ पासून निळसर पाणी वाहू लागली आहे .यामुळे ग्रामस्थातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे या भागातील कचखळग्यातुन अचानकपणे एकाच भागातून निळसर पाणी वाहण्यामागचे कारण शोधण्याची मागणी होत आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील काटी रस्त्यावर तलाव आहे या तलावाच्या खालच्या भागातील ओढ्यातून अचानक निळे पाणी वाहू लागली आहे. अखंडित हे निळसर पाणी वाहत आहे हे पाणी बार्शी तालुक्यातील आळजापुर तलावात पोहोचली आहे या निळसर पाण्याच्या बाबतीत अनेक चर्चा रंगत आहेत संबंधित भागास तलाठी यांनी भेट देऊन पाहणी केले आहे. सध्या मृग नक्षत्राचा पाऊस पडत आहे शेत शिवारातील पावसाचे पाणी कचखळग्यातुन उतरत्या भागाला वाहत आहे. एका खड्यातून निळसर पाणी अचानक वाहू लागल्याने परिसरात खळबळ माजली आहे निळसर वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांची गर्दी होत आहे.
वीज पडल्यानंतर का आले निळे पाणी
विज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का लागले या प्रश्नाचे शोध घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे त्यासाठी भूगर्भशास्त्राची मदत घेतली जाणार आहे अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे धाराशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे परंतु धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील या प्रकाराची चर्चा सर्वत्र होत आहे. मसला खुर्द भागात निळसर पाणी वाहत असल्याच्या संदर्भात तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले या भागात वीज पडल्यामुळे भूगर्भातील हालचालीमुळे पाणी निळसर झाल्याची शक्यता आहे. या निळसर पाण्याचे कारण शोधण्यासाठी वरिष्ठ पातळीवर याची माहिती सादर करणार असल्याचे ते म्हणाले
0 Comments