Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी श्री. विश्वनाथ दहिफळे यांची निवड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी श्री. विश्वनाथ दहिफळे यांची निवड


धाराशिव : जिल्हा खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर सेवक संघ धाराशिव ची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी ठीक ११.०० वाजता श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालय, धाराशिव येथे संपन्न झाली. सर्व साधारण सभेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह श्री. शिवाजीराव खांडेकर सर राज्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. खैरुददीन सय्यद तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यवाह श्री. संजय कावळे सर हे उपस्थित होते. संघटनेच्या रिक्त असलेल्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालयाचे वरीष्ठ लिपीक श्री. विश्वनाथ सोपानराव दहिफळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुचक श्री. दिनेश मिरजे सर व अनुमोदक श्री. श्रीमंत पवार सर हे होते. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबददल श्री. विश्वनाथ दहिफळे यांचा महामंडळाचे सरकार्यवाह श्री. शिवाजीराव खांडेकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्वसाधारण सभेस संघटनेचे सर्व पदाधिकारी व विविध विद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments