शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू|
बारामती: शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निंबुत तालुका बारामती येथील गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे यांच्यासह अन्य तिघा जनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक रणजीत निंबाळकर यांना सुंदर हा बैल नींबूत येथील गौतम काकडे यांना 37 लाखांना विकला होता. त्यापैकी पाच लाख विसर दिला होता उर्वरित 32 लाख नेण्यासाठी गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना बोलवून घेतले. त्यावेळी झालेल्या वादात गौतम काकडे याची भाऊ गौरव काकडे यांनी निंबाळकर यांच्यावर गोळी झाली होती. यात गंभीर जखमी झालेल्या निंबाळकर यांच्यावर पुणे येथील दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना चारदरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गौरव काकडे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना अटक करण्यात आली आहे. फरारी गौतम काकडे याचा शोध पोलीस घेत आहेत, निंबाळकर यांच्या बातमीची वृत्त समजतात बैलगाडी प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुपारी एकच्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात निंबाळकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक हजारो बैलगाडा प्रेमी जमा झाली होती. त्याने गौतम काकडे यांना तात्काळ अटक करून सुंदर बैल निंबाळकर कुटुंबांना देण्यात यावा या मागणीसाठी पोलीस ठाण्याचे आवारात ठिय्या मांडला होता. सुंदर बैलाला आमच्या हवाले करा अन्यथा गौतम काकडे यांच्या घरासमोर अंत्यविधी करू अशी भूमिका घेतली होती. यावेळ उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी आरोपीच्या शोधात आठ पथके रवाना केले असून लवकरात लवकर आरोपींना अटक करू शिवाय सुंदर बैलाच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस तैनात असून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बैल ताब्यात देऊ असा शब्द दिल्यानंतर जमाव शांत झाला.
यावेळी निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांचा अश्रूचा बांध फुटला, अंकिता निंबाळकर व त्यांच्या दहा महिन्याच्या मुलीसमोर निंबाळकर यांच्यावर गोळी घालण्यात आली होती. मात्र रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी अंकिता यांच्यापासून लपवुन ठेवण्यात आली होती, मात्र सुंदर बैल मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेह हलवणार नाही, दरम्यान रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याचे अंकिता यांना समजले. यावेळी अंकिता यांना जबर धक्का बसला. त्यांचे धाय मोकलुन रडणे पाहून उपस्थितांच्या पोटात कालवले. निंबाळकर यांच्या मृत्यूची बातमी समजतात संबंध बैलगाडी प्रेमी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments