धाराशिव : वस्तीगृहातील मूकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम काळजीवाहकास आजन्म कारावास व एक लाख दंडाची शिक्षा तुळजापूर तालुक्यातील प्रकरण|
धाराशिव: मूकबधिर अल्पवयीन मुलीवर वस्तीगृहात अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आजन्म कारावास व एक लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धाराशिव पोलिसांच्या दामिनी पथकाने बालहक्क सुरक्षा सप्ताह सुरू असताना मूकबधिर निवासी शाळेस भेट दिल्यानंतर सहावीच्या वर्गातील एका मुलीने तिच्यावर वस्तीगृहातील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. अत्याचार झाल्यानंतर या मुलीने कोणालाही काही सांगितले नव्हते तब्बल 43 दिवसानंतर दामिनी पथकामुळे हा गुन्हा उघडकीस आला. समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शाहीर नाना आष्टुळ याला शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र सादर केली होते. प्रकरणाच्या सुनावणीनंतर आरोपी वस्तीग्रहाची काळजीवाहक शाहीर नाना आष्टुळ राहणार (मोहोळ) यास मुख्य न्यायाधीशांनी वरील प्रमाणे शिक्षक ठोठावली आहे. या प्रकरणाबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 नोव्हेंबर 2019 रोजी धाराशिव जिल्हा पोलीस व बालकल्याण विभाग यांच्या वतीने बाल हक्क सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला होता.
यासाठी निर्माण केलेल्या दामिनी पथकाने तुळजापूर तालुक्यातील एका मूकबधिर निवासी शाळेस व वसतिगृहास स्ञीग्रहास भेट दिली होती यावेळी तेथील एका इयत्ता सहावीच्या वर्गातील अल्पवयीन मूकबधिर मुलीशी संवाद साधत असताना त्या शाळेच्या वस्तीगृहातीलच काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केले असल्याची उघडकीस आले.
त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्याने पीडित मुलीचा विशेष शिक्षेची मुदत घेऊन तक्रारी जबाब नोंदवला यामध्ये 11 ऑक्टोबर 2019 रोजी स्वयंपाक करणारी मावशी घरी गेली होती, तसेच दिवाळीच्या सुट्टीत शाळेतील विद्यार्थीही गावी गेले होते, त्यावेळी सायंकाळी सहा वाजता पाऊस चालू असताना पीडित मुलगी ही वस्तीगृहातील स्वयंपाक घरातील चुली समोर शेकत असताना स्वयंपाक घरात तसेच बाथरूम समोर आरोपीने तिच्यावर दोन वेळेस लैंगिक अत्याचार केल्याचे तिने साइन लँग्वेजमध्ये विशेष शिक्षिका समोर सांगितले. सदर जबाबवरून वस्तीग्रहाचा काळजीवाहक आरोपी शाहीर नाना अष्टोळ (रा. मोहोळ जिल्हा सोलापूर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान चे कलम 376 (2) 376 (3) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चार व सहानुसार तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीती सावंत यांनी केला तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सुनावणी दरम्यान एकूण 17 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या यामध्ये विशेष शिक्षकांचे मोलाचे सहकार मिळाले यामध्ये समोर आलेला पुरावा साक्ष आणि पिढीतेच्या वतीने सहाय्यक शासकीय अभियोग्यता ऍडव्होकेट सचिन सूर्यवंशी यांनी म्हणली बाजू ग्राह्य धरत या प्रकरणात आरोपीस दोषी ठरवत आरोपी शाहीर नाना अष्टोळ यास मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस शेंडे यांनी आजन्म कारावास व एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे .
सदरील दंडाची रक्कम आरोपीने न्यायालयात जमा केल्यास सदर रक्कम एक वर्षानंतर किंवा अपीरातील आदेशानंतर पिढीतेचे आईस देण्यात यावी असे निकालात नमूद केले आहे विशेष म्हणजे आरोपीचे लग्न झालेले असून त्याला पिढी तिच्या वयाच्या मुली असतानाही त्यांनी सदरचे दुष्कर्म केलेले होते.
बाल हक्क सुरक्षा सप्ताहामुळे गुन्हा उघडकीस
जिल्हा पोलीस व बालकल्याण विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील मुलींचे वस्तीग्रह निवासी शाळा विविध शाळा आधी ठिकाणी बालहक्क सुरक्षा सप्ताह राबविण्यात येतो. पीडिता ही मूकबधिर व अल्पवयीन विद्यार्थी असल्याने तसेच आरोपी हा तिच्या वस्तीग्रहातील काळजीवाहक असल्यामुळे आरोपीने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत तात्काळ कोणालाही सांगितले नव्हते त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास 43 दिवसाचा उशीर झाला होता जर का पोलीस विभागाच्या दामिनी पथकाने सदर वस्तीगृहावर भेट देऊन इतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत पीडितेकडे चौकशी केली नसती तर सदरचा गुन्हा उघडकीस आला.
0 Comments