हवामान अंदाज : मान्सून विदर्भ व्यापला राज्यात पावसाला पोषक हवामान |
पुणे : मान्सूनच्या प्रवासाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे मान्सूनने शुक्रवारी महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करीत संपूर्ण विदर्भ व्यापला आहे दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज येल्लो अलर्ट असून पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मान्सून सक्रिय होऊन गुरुवारी काही भागात प्रगती केली होती .
त्यानंतर ही शुक्रवारी मान्सून राज्यासह देशाच्या आणखी काही भागात पोहोचला आहे मध्ये प्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड आणि ओडिसा पश्चिम बंगाल आणि झारखंडचे आणखी भागात मानसून दाखल झाला मान्सूनची सीमा शुक्रवारी नवसारी जळगाव मांडला केंद्रा रोड झारसुगुंडा बालासोर हल्दिया पाकुर साईबंगच आणि रॉकसोल भागात होती मान्सून येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या उर्वरित भागात तसेच अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहोचणार आहे .
राज्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत महाबळेश्वर कोल्हापूर सातारा सांताक्रुज रत्नागिरी परभणी नागपूर वर्धा भागात पावसाची नोंद झाली तसेच राज्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे येत्या 22 ते 25 जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज येलो अलर्ट असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तसेच मराठवाडा विदर्भातील काही भागात येल्लो अलर्ट कायम असून मेघग गरजेने सह पावसाची शक्यता आहे पाऊस व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान घटले आहे शुक्रवारी राज्यात सर्वात जास्त तापमान जळगाव येथे 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
0 Comments