धाराशिव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३० जुलैपर्यंत १ लाख ९४ हजार महिलांचे अर्ज समित्यांची १ लाख ११ हजार अर्जांना मान्यता
धाराशिव दि. ३१ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र असलेली कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या माध्यमातून काम करीत आहे.पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले असून पात्र लाभार्थी महिलेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
30 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 1 लक्ष 94 हजार 814 महिलांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहे. प्राप्त अर्जापैकी तालुका समित्यांनी 1 लक्ष 11 हजार 402 महिलांच्या अर्जांना मान्यता दिली आहे. 30 जुलै रोजी या एका दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2206 महिलांनी आणि नागरी भागातील 1286 महिलांनी अर्ज दाखल केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यास सुरुवात झाली त्या दिवसापासून 30 जुलैपर्यंत ग्रामीण भागातील 52 हजार 838 महिलांचे आणि शहरी भागातील 4542 महिलांचे असे एकूण 57 हजार 380 अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले.1 लाख 30 हजार 437 ग्रामीण महिलांचे आणि 6997 शहरी भागातील महिलांचे अशा एकूण 1 लक्ष 37 हजार 434 महिलांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले.त्यापैकी ग्रामीण भागातील 1 लक्ष 7 हजार 717 महिलांचे तर ग्रामीण भागातील 4285 महिलांचे अर्ज असे एकूण 1 लक्ष 11 हजार 402 महिलांच्या अर्जांना तालुका समित्यांनी लाभासाठी पात्र ठरवले आहे.या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याची 15 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत असून जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले आहे.
0 Comments