Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑनर किलिंग : आंतरजातीय प्रेमविवाहातून खून जावयाची हत्या करणारा सासरा, चुलत मेहुना अटकेत|Honor killing: Father-in-law,

ऑनर किलिंग : आंतरजातीय प्रेमविवाहातून खून जावयाची हत्या करणारा सासरा, चुलत मेहुना अटकेत

छत्रपती संभाजीनगर : एकच गल्लीत राहणाऱ्या तरुणाची आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडील आणि चुलत भावाने तरुणावर भर रस्त्याच्या चाकूने सपासप वर केल्याची घटना 14 जुलै रोजी इंदिरानगर भागात घडली होती यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अकरा दिवस मृत्यूची झुंज देत अखेर 25 जुलैला दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या मारेकऱ्यापैकी चुलत मेहुना आप्पासाहेब कीर्तीशाही याला उप आयुक्तांच्या विशेष पथकाने शनिवारी हरसुल परिसरातून अटक केली आहे तर ासर्‍याला जवाहर नगर पोलिसांनी जालन्यातून जेरबंद केले आहे.

गारखेडा परिसरातील इंदिरानगर मधील अमित मुरलीधर साळुंखे या तरुणाची गल्लीतच राहणाऱ्या गीताराम कीर्तीशाही यांच्या मुलीशी प्रेम संबंध होते अमित आणि तरुणीने दोन मे रोजी प्रेम विवाह केला मात्र या विवाहाला कीर्तीशही कुटुंबीयांच्या विरोध होता .विवाह सोहळा पार पडल्यानंतर गीताराम कीर्ती शाही व अप्पासाहेब कीर्तीशाही यांनी मुरलीधर साळुंखे यांची भेट घेतली होती यावेळी अमित व त्यांच्या पत्नीला आमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली होती. यानंतर 14 जुलै रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास साळुंखे कुटुंबियांनी सोबत जेवण केले जेवणानंतर अमित फिरण्यासाठी घराबाहेर पडताच रात्री पाहुणे अकराच्या सुमारास सासरा गीताराम कीर्ती सही व चुलत मिळून आप्पासाहेब कीर्तीसही यांनी भर रस्त्यात अमितच्या दोन्ही तळहातासह डाव्या मांडीवर आणि पोटात चाकूने सपासक वार केली होत अमितच्या किंचाळण्याचा आवाज कानी पडताच साळुंखे कुटुंबाने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केली होती. यावेळी अमितने सासरा आणि चुलत मेहुण्याने छकुला केल्याचे सांगितले होते.

अमित व रुग्णालयात उपचार सुरू होते अकरा दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर 25 जुलै रोजी अमितचा मृत्यू झाला याप्रकरणी रोगावर कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आला आहे.

लॉन्स समोर येतात मुस्क्या आवळल्या

उपयुक्त नितीन बगाटे यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक विशाल खटके जमादार शशिकांत सोनवणे आणि विशाल पाटील यांनी शनिवारी दुपरी हरसुल परिसरातील मयुरी लॉन्स समोर सापळा रचला तेथे आप्पासाहेब कीर्ती शाही येतात त्यांच्या पथकाने मुसकी आवळल्या त्यांच्या अटकेची क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करून जवाहर नगर पोलिसाच्या शोधीन करण्यात आले.

या घटनेनंतर प्रसार झालेल्या दोघांचा शोध सुरू होता शनिवारी अप्पासाहेब कीर्ती शैला अटक केली होती तर रविवारी जालना येथून गीताराम कीर्ती शाई यांनी त्याला मदत करणारा स्वप्निल पटेकर या दोघांना अटक केली दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता एक ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments