Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील ३४ अंगणवाडी मदतनीस जागेच्या पदासाठी अर्ज मागविले, ९ जुलै पर्यंत अर्ज सादर करा|Tujapur Taluka anganwadi madatnis bharati

तुळजापूर तालुक्यातील ३४ अंगणवाडी मदतनीस जागेच्या पदासाठी अर्ज मागविले, ९ जुलै पर्यंत अर्जj सादर करा


धाराशिव दि,२ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ग्रामीण प्रकल्प) तुळजापूर अंतर्गत येणाऱ्या 34 अंगणवाडीमधील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून निकष,अटी,शर्ती व गुणदान पद्धतीच्या अधिन राहुन विहित नमुन्यात अर्ज मागविले आहे.

ज्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज मागविले आहे,त्या ग्रामपंचायतीची नावे पुढीलप्रमाणे आहे.ग्रामपंचायत सलगरा, देवसिंगा,कार्ला,जवळगा (मे),किलज अंतर्गत गवंडी तांडा व आमराई तांडा, गंधोराअंतर्गत रामनगर तांडा,विनोदनगर व नागझरी तांडा,खुदावाडीअंतर्गत पाटीलतांडा, ईटकळ,बाभळगाव, देवसिंगा नळ,सांगवी मार्डी,सावंगी काटी, सुरतगाव, काटी, देव कुरुळी, खानापूर,दिंडेगाव अंतर्गत टेलरनगर, दीपकनगर, मंगरूळ अंतर्गत वाघजाई घाट व खंडाळकरवाडी, ढेकरी,कुंभारी,चिंचोली,वानेवाडीअंतर्गत सावंतवाडी, वडगाव काटी, तामलवाडी, धनगरवाडी चव्हाणवाडी, फुलवाडी, अणदूरअंतर्गत चिकणी तांडा,अणदूर येथील दोन अंगणवाडी मदतनीससाठी अर्ज मागविले आहे.

या रिक्त असलेल्या पदासाठी 9 जुलैपर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालय,तुळजापूर येथे स्वीकारले जाणार आहे.असे बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प तुळजापूर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments