Hot Posts

6/recent/ticker-posts

बांगलादेशच्या बॉर्डरवर 3000 हजार टन कांदा पडून ! निर्यातीला फटका भाव गडगडण्याची भीती

बांगलादेशच्या बॉर्डरवर 3000 हजार टन कांदा पडून ! निर्यातीला फटका भाव गडगडण्याची भीती 


नाशिक: भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3% निर्यात एकट्या बांगलादेशात होते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून तिथे सुरू असलेल्या हिंसाचाराचा आता कांदा निर्यातीला मोठा फटका बसला आहे या देशातील अराजकीय नंतर भारताने आपल्या सीमा शील केले आहेत; परिणामी  नाशिकहून बांगलादेशसाठी गेलेल्या जवळपास 3000 हजार  टन कांदा टॅक्स मध्ये पडून आहे. ,आता हा कांदा खराब होण्याची भीती असून बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशांतर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.

भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार सुरू आहे या राजकीय संघर्षामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा आहे देत देश शिल केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात हिंसाचार्यातील तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे .बांगलादेशशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत दोन्ही देश अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात करतात भारत हा बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार देश आहे कृषी सहाय्यक विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ष 2023 -24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3% कांदा हा बांगलादेशात गेला आहे; मात्र सध्या बांगलादेशची आर्थिक परिस्थिती नाजूक असून बांगलादेशच्या चलनाचे जवळपास 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे त्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे त्याचाच आता भारताने बांगलादेश ला लागून असलेल्या सीमा बंद केल्यामुळे भारतातून होणारी आयात निर्यात ठप्प झाली आहे त्याचा फटका नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांना बसतो आहे बांगलादेश साठी सिमेलगत अडकून पडले असल्याची माहिती कांदा निर्यात दाराकडून देण्यात आली आहे. जास्त दिवस हे सुरू राहिल्यास कांदा निर्यात ठप्प होऊन ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हा कांदा खराब होईल परिणामी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कांदा निर्यात साठी हवे प्रयत्न

स्थानिक बाजारात पावसाळी वातावरण असल्याने आवक कमी असल्यामुळे बाजार भाव 2000 ते 2700 पर्यंत स्थिर आहे बांगलादेशात परिस्थिती आटोक्यात मिळाल्यास कांदा निर्यात होणार नाही स्थानिक बाजारात आवक वाढेल आणि भाव गडगडतील त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेश व इतर देशांमध्ये जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे मागणी शेतकरी संघटना कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. 

कोलकत्त्यातच विकण्याची नामुष्की 

भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडलेला हा कांदा कमी भावात कोलकत्याचाच विकण्याची नामुष्की ओढ होऊ शकते 50 हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील 85 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता मात्र सध्या सीमा शील केले असल्याने कांद्याचे टॅक्स जागीच थांबले आहेत कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्याने रोजचे कोट्याधीश रुपयाची व्यवहारी बंद आहेत.

Post a Comment

0 Comments