दोन लाखाची लाच घेणाऱा मंडल अधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात-
महसुल विभाग लाच स्विकारण्यात ठरताेय आव्वल....!
सोलापूर : संगणकीकरणामुळे बंद झालेला सातबारा उतारा चालू करून देण्यासाठी सहा लाखाची लाच मागून तडजोड करून चार लाख ठरले आणि त्यातील पहिला हप्ता २ लाख घेतल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. संदिप भिमराव लटके, पद मंडळ अधिकारी, (वर्ग-३), नेमणूक सोरेगांव मंडळ, तहसिल उत्तर सोलापूर जि. सोलापूर व पवनकुमार मोहनराव चव्हाण, पद तलाठी, (वर्ग-३) नेमणूक सज्जा नेहरुनगर सोलापूर, तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर जि. सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीची नेहरुनगर सोलापूर येथे ८६.६७ आर खुली जागा असून महसुल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे सदर जागेचा बंद झालेला ७/१२ उतारा पुन्हा चालु करण्याचे अनुषंगाने महसुल अधिनियम कलम १५५ अंतर्गत तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्याकरीता संदिप लटके, पद मंडळ अधिकारी सोरेगांव व पवनकुमार चव्हाण, पद- तलाठी नेहरुनगर सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ६,००,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंति ४,००,००० रुपये लाच रक्कम स्वीकारण्यची संमती दिली.व त्यापैकी पहिला हप्ता २,००,००० रुपये स्वीकारण्यास संमती दिल्यावरुन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments