जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातील शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे आपचे जिल्हाउपाध्यक्ष मधुकर शेळके यांची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव :- जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातील शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर बबनराव शेळके यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की,आम आदमी पार्टी धाराशिव जिल्हा वतीने आम्ही मागणी करित आहोत कि जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत -शासकीय अनुदानित ,खाजगी विनाअनुदानीत , स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा,इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा या ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत तसेच संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदरील कॅमेर्याची फुटेजची तपासणी किमान आठवड्यातून तीन वेळस करावी, नोंदी ठेवाव्यात .शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात व त्याची अंमलबजावणी काटेकोरपने करावी .
शाळेत कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग , सुरक्षारक्षक, यांची संपूर्ण माहिती ठेवावी .शाळेत शिक्षक पालक समीती , सखी सावित्री समीती स्थापन करण्यात यावी तसेच शिक्षणाधिकार्यांच्या मार्गदर्शनखाली संबंधीत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत शालेय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात यावी .सुचना व तक्रारपेटी शाळेत असावी शाळेतील शिक्षक व इतर कर्मचार्याना ओळखपत्र बंधनकारक करावे ,विद्यार्थ्यांना ओळखपत्र संबंधीत शाळेने दयावेत शालेय वेळेत शिक्षकांचा मोबाईल बंद असावा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत संबंधीत नियमांचे सुचनांचे पालन योग्य रित्या केले जात आहे का नाही यांची पाहणी वेळोवेळी संबंधीत शाळेला भेट देऊन जिल्हयातील शिक्षणविभागाने करावी.,नियमांचे सुचनांचे पालन न करणाऱ्या संबंधीत शाळेवर योग्य ती कार्यवाही करावी ,विशेषतः खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळे संदर्भातील पालकांच्या तक्रारी बाबत जिल्हातील शालेय विभागाने योग्य व तात्काळ दखल घ्यावी व त्यानुसार चौकशी करून कार्यवाही करावी .तरी वरिल मागण्या व उपाययोजना बाबत आपन योग्य तो सकारात्मक विचार करावा व संबंधीत सर्व माध्यमांच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा यंत्रणा उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोनातून सुचना देण्यात याव्यात असे निवेदनात नमूद केले आहे .यावेळी आप जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके व आम आदमी पार्टीचे ,आनंद हात्तीकर विकास घोडके,रोहित शेंडगे आपचेमाजी शहराध्यक्ष प्रशांत इंगळे सदस्य,कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments