छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटनेचा धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध, तहसीलदार यांना निवेदन
तुळजापूर -आम आदमी पार्टी धाराशिव च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मालवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला या दुर्दैवी घटनेचा आज आम आदमी पार्टी धाराशिव च्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला व तहसिलदार , तुळजापूर यांच्या मार्फत मा. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले .
सदरील घटना अत्यंत गंभीर असून, आठ महिन्यांमध्ये स्मारक कोसळते या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे किती खालच्या दर्जापर्यंत निकृष्ट काम करण्याची वृत्ती आणि भ्रष्टाचाराचे मूळ , दोषी असणारे नेते असतील गुत्तेदार असतील अधिकारी असतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली .
या घटनेचा आम आदमी पार्टी धाराशिवच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व निवेदन देण्यात आले निवेदनावर आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके, तुळजापूर शहर अध्यक्ष किरण यादव, विकास घोडके, रोहीत शेंडगे, युवराज जानराव, वैजनाथ पांडागळे यांच्या स्वाक्षरी आहेत तसेच यावेळी पक्षातील कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते .
0 Comments