Hot Posts

6/recent/ticker-posts

बाभळगाव येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी विकास पाटील तर उपाध्यक्षपदी अशोकराव जाधव यांची बिनविरोध निवड

बाभळगाव येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी विकास पाटील तर उपाध्यक्षपदी अशोकराव जाधव यांची बिनविरोध निवड


 तुळजापूर : तालुक्यातील बाभळगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून श्री विकास आप्पा नागनाथराव पाटील यांचे बिनविरोध अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच शिक्षक नेते ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांचे तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ पदी सुद्धा अशोकराव जाधव यांची निवड करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष गावचे सरपंच सौ. सुरेखाताई कांबळे तसेच ग्रामसेवक कांबळे साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार सर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी अमर दादा पाटील शिवाजी संपंगे ,जितेंद्र पाटील, जयंत पाटील ,पुष्पक  कसबे, एडवोकेट गोविंद नरहरी पाटील, अडवोकेट किशोर पाटील , सत्यशोर बिराजदार ,प्रशांत बिराजदार गावातील अविनाश जाधव नितीन कांबळे गणेश देवकर चंद्रकांत धनवडे शामराव धनवडे सुभाष बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. एकमताने निवड झाल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्षांचे पुष्पहार शाल व पेढा भरून यथोचित सत्कार करण्यात आला शेवटी विकासाप्पा पाटील व अशोकराव जाधव यांनी सर्व ग्रामस्थांचे निवड केल्याप्रकरणी आभार मानले.


Post a Comment

0 Comments