तुळजापूर बसस्थानकातुन महिलेचा मोबाईल लंपास, बस स्थानकात चोरीचे सत्र सुरूच
तुळजापूर : बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलेचा मोबाईल फोन लंपास केल्याची घटना मंगळवारी तुळजापूर बस स्थानकावर घडली..
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारी येथील रुक्मिणी वैभव माळी यांचे अंदाजे आठ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हा 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने चोरून नेला याप्रकरणी रुक्मिणी माळी यांनी 21 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 303 (2) अन्वे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर बस स्थानकामध्ये मागील सहा महिन्यापासून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून याकडे पोलीस प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे मात्र तसे होताना दिसत नाही . बस स्थानकामध्ये पाकीटमार, दागिने, रोख रक्कम अशा चोऱ्या वाढल्या आहेत, ग्रामीण भागातील लोक तुळजापूर बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात येतात मात्र अशा वाढलेल्या चोरींच्या प्रमाणामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, चोरी झाली तर चोरट्यांचा छडाच लागत नाही म्हणून काही लोक फिर्याद देऊन तर काय उपयोग चोरीचा तपासच होत नाही फिर्याद द्यायची कशाला ? असा संतापजनक सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे तरी याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ बस स्थानकातील चोरट्यांना जेर बंद करावे अशी मागणी प्रवाशातून होत आहे
0 Comments