बीड :लाच घेणाऱ्या सोसायटीच्या चेअरमन सह दोघांवर गुन्हा दाखल धाराशिव येथील एसीबीची कारवाई
बीड: लेखापरीक्षणाचा धनादेश देण्यासाठी एक लाख 25 हजार रुपयाची लाज स्वीकारण्याचे सेवा सहकारी संस्था सचिवांनी मान्य करत पैसे स्वीकारले तसेच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले या प्रकरणी दोघाविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई धाराशिव येथील लाच लचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केली.
याबाबत एसीबी कडून मिळालेली सविस्तर वृत्त असे की परळी तालुक्यातील वानटाकळी सेवा सहकारी संस्थेचे सचिव बाबासाहेब धोंडीराम सिघे व परळी तालुक्यातील सारडगाव येथील सेवा सहकारी संस्थेचे सचिव अंकुश पवार अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांनी वानटाकळी सेवा सहकारी संस्थेचे सन 2018 ते 2021 पर्यंतचे लेखा परीक्षण करून अहवाल सादर केला होता तक्रारदार यांनी केलेल्या लेखा परीक्षणाच्या नियमानुसार दोन लाख 51 हजार रुपयांचा धनादेश तक्रारदार यांना देण्यासाठी सचिव बाबासाहेब शिगे यांनी पंचायत समक्ष देय रकमेच्या निम्म्या रकमेची मागणी करून तडजोडी यांची एक लाख 25 हजार रुपयांच्य लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याची मान्य केले तसेच आरोपी लोकसेवक अंकुश पवार यांनी रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले सदरील रक्कम स्वीकारताना सीगे याला रंगीहात पकडण्यात आले या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई पोलीस अंमलदार आशिष पाटील सिद्धेश्वर तावस्कर सचिन शेवाळे दत्तात्रय करडे यांनी केली.
0 Comments