पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अंडी, केळींचा लाभ
छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना अंडी व केळी या पदार्थाचा लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आह. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो यामध्ये अंड्याचा समावेश करण्यात आला आहे अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने उष्मांक जीवनसत्वे,लोह , कॅल्शियम , कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकेल. त्या अनुषंगाने नियमित आहारासोबत अंडी केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्रिस्तरीय पाककृती अंतर्गत निर्धारित केलेल्या पाककृतीमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी अंडा पुलाव या स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाचा आहे शासन निर्णय 14 ऑगस्ट 2024 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्यांसाठी विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या पाच महिने दोन वेळा असे एकूण दहा आठवड्यांसाठी अंडी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाची आहेत.
अंडी न खाणाऱ्यांना केळी
ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना अंडा पुलाव या स्वरूपात सदर पदार्थाचा लाभ द्यावा तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडा ऐवजी निर्धारित केलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे.
शाळांना अंड्यामागे निधी
सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजार भाव विचारत घेता एका अंड्यांसाठी पाच रुपये इतका निधी चार आठवड्यांकरता अग्रीम स्वरूपात शाळांना देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्या करता अग्रीम स्वरूपात शाळा स्तरावर उपलब्ध असलेल्या निधी मधून सदरचा खर्च भागवावा.
0 Comments