तुळजापूर :ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, फवारणीच्या खर्चात वाढ शेतकरी त्रस्त
तुळजापूर: राज्यात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी मृदाच्या पहिल्याच टप्प्यात पेरण्या केल्या मात्र आता काही भागांमध्ये पावसाने उघडीत दिल्याने सोयाबीन सह अन्य पिकावर पाणी कुतरडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
तुळजापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणी सोयाबीनवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे .गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला हमीभाव इतका दर मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या हंगामात उत्पादन खर्च निघाला नाही अशातच आता यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकावर आलेल्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोयाबीनचे जवळपास 30 ते 40 टक्के पाने ही अळी खाऊन टाकत आहे आणि आता सोयाबीन काहींचे फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत तर काहींचे शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकांचे मोठ्या नुकसान होत आहे .परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू असून पेरणी केल्यापासून सतत सोयाबीनला फवारणी करावी लागत आहे यंदाच्या हंगामात फवारणी वरील खर्च मोठा प्रमाणात वाढ होणार आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून फवारणी खर्चाबाबत चिंताग्रस्त झाला आहे .,तर एका फवारणीसाठी एक तरी जवळपास दोन हजार रुपये इतका खर्च येत आहे त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
0 Comments