Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे महाराष्ट्र राज्य पोतराज महासंघाची बैठक संपन्न --- शेकडो पोतराजाची बैठकीसाठी उपस्थिती

चिवरी येथे महाराष्ट्र राज्य पोतराज महासंघाची बैठक संपन्न --- शेकडो पोतराजाची बैठकीसाठी उपस्थिती

--- पोतराजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोतराज आले एकत्र 

 


चिवरी/ राजगुरू साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे महाराष्ट्र राज्य पोतराज महासंघाची दिनांक 14 रोजी महालक्ष्मी मंदिरामध्ये बैठक संपन्न झाली 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वरसम्राट महाराष्ट्र राज्य पोतराज महासंघाचे अध्यक्ष मनोज भडकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष लखन नन्नवरे,उपाध्यक्ष दौलत कसबे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष नागनाथ शिंदे, उपाध्यक्ष धनराज सरवदे,मनोज कसबे, सुरेश पवार,मोहन भडकवाड, हणमंत उदारे, राजकुमार गायकवाड, कृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती 

यावेळी अध्यक्ष मनोज भडकवाड,दौलत कसबे, गणेश पागळे, हणमंत उदारे, राजकुमार गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किसन भोवाळ यांनी मनोगत व्यक्त करुन पोतराजांच्या समस्या व्यक्त केल्या,व पोतराज यांच्यावरती महाराष्ट्रात होणारे अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, महाराष्ट्र पातळीवर कार्य करणाऱ्या पोतराज यांची निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर बंटी देडे यांनी केले,तर आभार नागनाथ शिंदे यांनी मानले. यासाठी लक्ष्मण गायकवाड,किसन भोवाळ, मारुती भोवाळ,सुकेशन शिंदे यांच्यासह चिवरी येथील पोतराज महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी सोलापूर, लातूर, धाराशिव, येथून शेकडो पोतराज यासाठी उपस्थित होते.


व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://youtu.be/RstbHZ9ni_M?feature=shared

Post a Comment

0 Comments